LIVE : मध्यप्रदेशमध्ये ‘कमल’राज, राजस्थान-छत्तीसगडचा पेच कायम

122

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा करतील. तर छत्तीसगड आणि राजस्थानच्या सीएमपदाचा पेच कायम आहे. याच दरम्यान छत्तीसगडचा सीएम उद्या (14 डिसेंबर) ठरणार असल्याची माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाची चर्चा होती, तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात चूरस आहे. ज्येष्ठ आणि तरुण अशा या पेचात राहुल गांधी यांनी ज्येष्ठांना पसंती दिल्याचे दिसून आले.

 • मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड, प्रदेशाला उपमुख्यमंत्री नसणार

 • कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे भोपाळला पोहोचले, थोड्याच वेळात बैठक सुरू होणार

 • काँग्रेस कार्यालयाबाहेर झळकले कमलनाथ यांचे पोस्टर्स

 • मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड – सूत्र
 • छत्तीसगडचा सीएम उद्या (14 डिसेंबर) ठरणार, मल्लिकार्जुन खरगे यांची माहिती
 • छत्तीसगडमध्ये 15 डिसेंबरला गव्हर्नमेंट सायन्स कॉलेजच्या मैदानावर होणार शपथविधी
 • काँग्रेस नेते मल्लीकार्जुन खरगे आणि पीएल पुनिया राहुल गांधींच्या घरी पोहोचले
 • छत्तीसगडच्या सीएमपदासाठी राहुल गांधी यांच्या घरी बैठक सुरू
 • मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठीची बैठक संपली, थोड्याच वेळात घोषणा
 • कमलनाथ यांच्यापाठोपाठ ज्योतिरादित्य शिंदे भोपाळला रवाना, ही शर्यत खूर्चीसाठी नसल्याचे शिंदे यांचे वक्तव्य

 • भोपाळमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी कमलनाथ दिल्लीतून रवाना

 • धैर्य आणि वेळ हे दोन शक्तीशाली योद्धे, राहुल गांधी यांनी केला शिंदे आणि कमलनाथ यांच्यासोबतचा फोटो ट्वीट

 • राजस्थानच्या सीएमपदाचा पेच कायम, राहुल गांधी घेणार नेत्यांची भेट
 • बैठकीची वेळ पुन्हा बदलली, आता बैठक 11 ऐवजी 10 वाजता होणार
 • भोपाळमध्ये रात्री 8 वाजता होणारी आमदारांची बैठक टळली, 11 वाजता होणार बैठक
 • अशोक गहलोत यांना दिल्लीतच थांबवण्यात आले
 • अशोक गहलोत यांचे कार्यकर्त्यांना शांतात राखण्याचे आवाहन

 • काँग्रेस अध्यक्ष तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करतील, थोडी वाट पाहा – गहलोत

 • कमलनाथ दिल्लीत दाखल, राहुल गांधीची भेट घेण्यासाठी घरी रवाना, ज्योतिरादित्य शिंदेही राहुल गांधी यांच्या घरी हजर
 • कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे सचिन पायलट यांचे आवाहन, राहुल गांधी-सोनिया गांधींनी घेतलेला निर्णय मंजूर

 • राजस्थानमध्ये सचिन पायलट यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, घोषणाबाजी सुरू

 • मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्ते जमा झाले असून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू आहे.

मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे, तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात चूरस आहे. गुरुवारी सर्वात आधी सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर अशोक गहलोत हे राहुल यांच्या भेटीला आले. राहुल गांधी यांच्या भेटीनंतर दोघेही जयपूरला रवाना झाले होते. परंतु नावावर शिक्कामोर्तब न झाल्याने दोघांनाही दिल्लीतच रोखण्यात आले.

सायंकाळी चारच्या सुमारास माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील राहुल गांधी यांची भेट घेतली. सायंकाळी राजस्थान, मध्यप्रदेशसह छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

अपक्षांचा गहलोत यांना पाठिंबा
दरम्यान, राजस्थानमधील बहुतांश आमदारांना गहलोत यांच्या नावाची शिफारस केली आहे. अपक्ष आमदारांनी देखील गहलोत हे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या