नरेंद्र मोदी हे अंबानी, अदानींचे लाऊडस्पीकर

371
rahul-gandhi

तप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी, अदानी या बड्या उद्योगपतींचे लाऊडस्पीकर बनलेत. दिवसभर त्यांच्याविषयीच बोलतात, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केली. धनाढय़ मित्रांचे भले करण्यासाठी मोदी गरीबांच्या खिशात हात घालतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. नरेंद्र मोदी आणि खट्टर हे तुमच्या खिशातील पैसा घेऊन तो आपल्या 15 धनाढय़ मित्रांना देताहेत. मोदी जर स्वतŠला ‘सच्चा राष्ट्रवादी’ म्हणत असतील, तर ते सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम धनाढय़ मित्रांना का विकताहेत, असा सवाल राहुल यांनी केला. तुम्ही मोदींना ट्रम्प आणि अंबानी यांच्यासोबत बघाल. पण ते तुम्हाला शेतकऱ्यांबरोबर कधीही दिसणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

आम्ही जोडले, त्यांनी तोडले!

आम्ही लोकांना जोडले, मात्र त्यांनी ब्रिटिशांप्रमाणे वागून जात, धर्म आणि प्रदेशावर आधारित देशाची विभागणी केली, अशा शब्दांत राहुल यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही (आरएसएस) टार्गेट केले.

आपली प्रतिक्रिया द्या