पंतप्रधान मोदी आधी फ्रंटफुटवर खेळले, आता बॅकफुटवर; राहुल गांधींचा हल्लाबोल

6149
rahul_gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आणि लॉकडाउन अयशस्वी झाल्याचा आरोप केला. राहुल गांधी म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी दोन महिने आधी जाहीर केले होते की 21 दिवसात कोरोना व्हायरसला हरवू, मात्र 60 दिवसांनंतर देखील कोरोना व्हायरस वेगानं वाढत असतानाच लॉकडाउन हटवले जात आहे. राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाउनचा हेतू पूर्णपणे अपयशी ठरला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाउनच्या चार टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित परिणाम मिळाले नाही. अशा स्थितीत आम्ही सरकारला विचारतो आहोत की, सरकार पुढे कोणती पावलं उचलणार, कारण , लॉकडाउन फेल ठरले आहे. राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की, पंतप्रधान मोदी सुरुवातीला फ्रंटफुटवर खेळताना दिसले, आता मात्र ते बॅकफुटवर आहेत. मात्र पंतप्रधान मोदी यांना पुन्हा फ्रंटफुट यावे लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या