आरएसएसची तुलना मुस्लिम ब्रदरहूडशी, संघ फॅसिस्ट असल्याची राहुल गांधींची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना मुस्लिम ब्रदरहूडशी करत संघावर टीका केली. राहुल गांधी सध्या 10 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहे. सोमवारी रात्री त्यांनी लंडन इथल्या चॅथम हाऊससमोर आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की हिंदुस्थानातील लोकशाही पूर्णपणे बदलली आहे. यामागचे कारण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. संघ ही कट्टर विचारांची आणि फॅसिस्ट संघटना आहे जिने हिंदुस्थानातील जवळपास सगळ्या संस्थांवर आपला ताबा मिळवला आहे असा राहुल गांधी यांनी आरोप केला आहे.