भाजपने आमदारांना खोके देऊन कमलनाथ सरकार पाडले!

भारतीय जनता पार्टीने मनी पॉवर वापरून कमलनाथ सरकार पाडले, असा घणाघाती आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील राजपूर येथील सभेला राहुल गांधी यांनी संबोधित केले. त्या वेळी ते बोलत होते.

मोदी रोज लाखो रुपयांचे सूट घालतात  

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दररोज लाखो रुपयांचे सूट घालतात तर मी फक्त एक साधा पांढरा टी-शर्ट परिधान करतो, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. मोदींच्या कपडय़ांवरून टीका करताना ते म्हणाले, मोदी दर दिवशी निदान दोन सूट बदलतात. एकच सूट ते पुन्हा परिधान करताना तुम्ही पाहिलेय का? असा प्रश्न विचारताच जनतेमधून नाही असा सूर आला. मी हा एकच पांढरा शर्ट घालतो, असे राहुल गांधी म्हणाले.