स्वतःची टिमकी वाजवण्यात मोदी सरकारला ‘ए’ ग्रेड

44

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मोदी सरकारची चार वर्षे ही अनेक आघाडय़ांवर अपयशाची ठरली आहेत, असे सुनावतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘स्वतःची टिमकी वाजवण्यात मात्र भाजप सरकारला ‘ए’ ग्रेड द्यावा लागेल, असा सणसणीत टोला लगावला आहे. कृषी, परराष्ट्र धोरण, इंधनाच्या किमती आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत मोदी सरकारला त्यांनी ‘एफ’ ग्रेड दिला आहे. तर ‘योगा’च्या बाबतीत मात्र राहुल गांधी यांनी मोदी सरकारला ‘बी’ गेड दिला आहे. नवे नवे नारे देणे, घोषणा करणे यात मोदी यांचा हात कोणीच धरू शकत नाही, असेही राहुल म्हणाले.

‘जनपथ’वरून नव्हे तर ‘जनमत’ घेऊन सरकार चालते!

माझे सरकार ‘जनपथ’वरून नाही तर ‘जनमत’ घेऊन चालत आहे, अशा शब्दांत सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या ‘यूपीए’वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोफ डागली. ओडिशातील कटक येथील सभेत ते बोलत होते. जनधन, आधार आणि मोबाईलद्वारे आपल्या सरकारने ८० हजार कोटी रुपये चुकीच्या लोकांच्या हातात पडण्यापासून वाचवले असा दावा त्यांनी केला आपले सरकार हे ‘कन्फ्युजन’वाले नसून ‘कमिटमेंट’वाले आहे असे सांगून ते म्हणाले की, गरीबांच्या मेहनतीचा घाम हा गंगा, युमना, नर्मदेच्या जलाप्रमाणे पवित्र आहे.

आपली प्रतिक्रिया द्या