राहुल गांधींनी ‘फ्लाइंग किस’ केलं का? काय म्हणाले काँग्रेस नेते

rahul-gandhi-parliament

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘फ्लाइंग किस’ वरून लोकसभेत प्रचंड गदारोळ होत असताना, पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं आहे की खासदार राहुल गांधी हे सहज बाकांकडे इशारा करत होते आणि त्यांनी कोणत्याही मंत्री किंवा खासदाराकडे बघून इशारा केलेला नाही.

‘राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांच्या बाकांकडे बघत इशारा केला. फ्लाइंग किस करताना बंधू आणि भगिनींनो असं म्हणत ते बाहेर पडले. मात्र त्यांनी तसे कोणत्याही विशिष्ट मंत्री किंवा खासदाराकडे बघून केलेले नाही आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तर नाहीच नाही’, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्यानंतर लगेचच भाजप सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चेदरम्यान बोलणाऱ्या स्मृती इराणी यांनी आरोप केला आहे की राहुल गांधी यांनी सभागृह सोडण्यापूर्वी फ्लाइंग किस केला.

‘माझ्या आधी ज्यांना बोलण्याची संधी दिली गेली, त्यांनी जाण्यापूर्वी असभ्यता दाखवली. संसदेच्या महिला सदस्यांकडे पाहत फ्लाइंग किस देण्याचे असभ्य वर्तन यापूर्वी कधीही संसदेत पाहिले नव्हते’, असे इराणी म्हणाल्या.