श्रीनगरात नाटय़मय घडामोडी, विरोधकांच्या शिष्टमंडळाला विमानतळावरून परत पाठवले

317

 जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर परिस्थितीचा आढाका घेण्यासाठी काँग्रेस, माकप, भाकप, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल आदी विरोधी पक्षांचे नेते शनिवारी सकाळी श्रीनगरमध्ये दाखल झाले. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कश्मीरला निघालेल्या या नेत्यांना श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात येऊन परत दिल्लीला पाठविण्यात आले.

राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कश्मीरला जाण्याचा निर्णय विरोधी पक्षनेत्यांनी घेतला होता.  शनिवारी सकाळी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, के. सी. केणुगोपाल, आनंद शर्मा, माकप नेते सीताराम येचुरी,भाकपचे डी. राजा, तृणमूल काँग्रेसचे नेते दिनेश त्रिकेदी, राष्ट्रकादीचे नेते माजिद मेमन, द्रमुक नेते तिरुची सीका, राजद नेते मनोज झा, जेडीएसचे कुपेंद्र रेड्डी आणि शरद यादक यांचे शिष्टमंडळ श्रीनगर विमानतळावर उतरले, पण त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव तेथूनच दिल्लीला परत पाठवण्यात आले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणे येथे येणे म्हणजे केवळ राजकारण आहे, असे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या