राहुल गांधी आज कश्मीरात

263

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये नेमके काय चाललेय, असा सवाल करणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी कश्मीरमध्ये जाणार आहेत. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांना प्रत्यक्ष येऊनच परिस्थिती बघा, असे आवाहन केले होते. त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करत राहुल हे कलम 370 हद्दपार झाल्यानंतर पहिल्यांदाच कश्मीरमध्ये पाऊल ठेवणार आहेत.

राहुल यांच्यासोबत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भाकप नेते डी. राजा, माकप नेते सीताराम येचुरी, राजद नेते मनोज झा, मनोज सिन्हा आदी नेत्यांची फौज असणार आहे. कश्मीरच्या प्रशासनाने मात्र त्यांना कश्मीरमध्ये येण्याची गरज नसल्याचे सुनावले. कश्मीरमध्ये येण्याचे टाळून मेहरबानी करा, असे प्रशासनाने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या