आज तुमच्या चप्पल कोण उचलणार? ट्विटरवरून राहुल गांधींना सवाल

43

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी २ राज्यांचा दौरा करणार आहेत. राजस्थानमधील जालौर आणि गुजरातमधील बनासकांठा इथे ते भेट देणार आहेत. राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांना पावसानं अक्षरश: झोडपून काढलं आहे. दोन राज्यातील अनेक गावं पावसामुळे उध्वस्त झाली आहे. इतल्या नागरिकांना भेटण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी राहुल गांधींचा हा दौरा आहे. जेव्हा राहुल गांधींच्या दौऱ्याची माहिती ट्विटरवर जाहीर करण्यात आली तेव्हा ट्विटरवर राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या ट्विटचा पूर आला. त्यातल्या एकाने विचारलं की आज तुमची चप्पल कोण उचलणार आहे, या ट्विटमध्ये त्यांनी माजी केंद्रीयमंत्री नारायण सामी यांनी हातामध्ये चप्पल धरलेला फोटो देखील जोडण्यात आला आहे. ट्विटरवरून राहुल गांधींवर कशी टीका करण्यात आली ते पाहा

 

आपली प्रतिक्रिया द्या