राहुल गांधींनी वंदे मातरम् लवकर थांबवले?

35

सामना ऑनलाईन । बंगळुरु

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरम् चा अपमान केला असा आरोप भाजपने केला आहे. भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांनी एका कन्नड वृत्तवाहिनीचा व्हिडीओ ट्विट करत हा आरोप केला आहे.

या व्हिडीओमध्ये काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल राहुल गांधी यांच्याकडे येऊन त्यांना वंदे मातरम् साठी उभे राहण्यास सांगतात. त्यावर राहुल गांधी घड्याळाकडे बोट दाखवत प्लीज लवकर करा अशी सूचना त्यांना देतात. त्यानंतर वेणूगोपाल वंदे मातरम् गाणाऱ्या व्यक्तीला एकच ओळ गाण्याची सूचना करतात.

‘कर्नाटकातील एका सभेच्या दरम्यान राहुल गांधींनी वंदे मातरम् एकाच ओळीत संपवण्याची सूचना केली. त्यामुळेच आम्ही त्यांना शहजादा म्हणतो. अधिकार गाजवण्याची त्य़ांची वृत्ती भीतीदायक आहे.ते देशाला परिवाराची जाहगीर समजतात. त्यांची आपल्या इच्छेनुसार राष्ट्रगीतामध्ये संशोधन करण्याची इच्छा आहे का?’  असे ट्विट संबीत पात्रा यांनी केले आहे.

काँग्रेसने मात्र भाजपचे हे आरोप फेटाळले आहेत. भाजपकडून फेक व्हिडीओचा प्रसार केला जातोय असा दावा काँग्रेसने केला आहे. कर्नाटक विधानसभेसाठी १२ मे रोजी मतदान होणार असून १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या