कैलास मानसरोवर यात्रा; राहुल गांधी 35 कि.मी. चालले

25

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कैलास मानसरोवर यात्रेवर टीका करणाऱया भाजप नेत्यांना काँग्रेसने चोख उत्तर दिले आहे. राहुल गांधींच्या मानसरोवर यात्रेतील फोटो, व्हिडीओ आणि त्यांच्या फिटनेस वॉचचे आकडेच काँग्रेसने जारी केले आहेत. यात राहुल सुमारे 35 कि.मी. पायी चालल्याचे स्पष्ट होत आहे.

कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी फोटो शेअर केले. त्यावर भाजप नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत हे फोटो फेक असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू केली. त्याला उत्तर देताना काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून उत्तर देताना यात्रेचा पूर्ण तपशीलच जाहीर केले.

7 तास 23 मिनिटांत 35 कि.मी. अंतर कापले
काँग्रेसने फोटोसोबत फिटनेस वॉचचे आकडेच जारी केले. फोटोंमध्ये राहुल गांधी अन्य यात्रेकरूसोबत दिसत आहेत. राहुल यांनी आतापर्यंत 443 मिनिटांत (7 तास 23 मिनिटे) 35 कि.मी.चे अंतर कापले आहे. द्वेषाची भाषा करणाऱयांना मागे सारून राहुल गांधी यात्रेचा मार्ग सर करीत आहेत, असे यात म्हटले आहे.

‘शिव ब्रह्मांड है’ आणि द्वेष, मत्सराला थारा नाही
राहुल गांधी यांनी ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्याखाली ‘शिव ब्रह्मांड है’ अशी शिवस्तुती व्यक्त केली आहे. तसेच मानसरोवराचे पाणी शांत, स्थिर आणि मधुर आहे. येथे तुम्हाला चांगली अनुभूती होते. द्वेष, मत्सराला येथे कोणताही थारा नाही अशा शब्दांत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या