पैशाच्या जोरावर भाजपाने निवडणुका जिंकल्याचा राहुल गांधींचा आरोप

34

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राहुल गांधींनी पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या पराभवाचा स्वीकार करत येत्या काळात पक्षात फेरबदल करण्याचे त्यांनी संकेत दिले. मौन सोडल्यानंतर राहुल गांधींनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपने पैशांच्या जोरावर मतदारांना आपल्याकडे खेचल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

‘आम्ही सध्या विरोधकांच्या भूमिकेत आहोत, राजकारणात चढ-उतार येत असतात. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये आम्ही लोकांची मतं जिंकण्यात अयशस्वी झालो. या पार्श्वभुमीवर येत्या काळात कॉंग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात येतील, अशी प्रतिक्रिया निवडणुकीतील पराभवाबाबत राहुल गांधी यांनी दिली आहे.

पाच राज्यांपैकी तीन राज्यांत आम्ही चांगली कामगिरी केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पंजाबमध्ये आम्ही सरकार स्थापन करू, तसेच गोवा मणिपूरमध्येही काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्याचं राहुल यांनी सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या