मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात डान्स बारवर छापा; २५ जणांना अटक

35
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । नागपूर

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात पोलिसांनी एचबी टाऊनजवळ असलेल्या पायल डान्स बारवर छापा मारून डान्स बारचा अड्डा उद्ध्वस्त केला. घटनेच्या वेळी या बारमध्ये २५ ग्राहक होते व चार तरुणी अतिशय बीभत्स चाळे करीत नाचत होत्या. पोलिसांनी बारचा मालक, व्यवस्थापक आणि २५ ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून बारचा मालक फरारी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पायल बारमध्ये पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये गजल गायनाच्या नावाखाली डान्स बार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला. या बारचा मालक कमलेश नागपाल आहे.

याकेळी बारमध्ये अत्यंत तोकडय़ा कपडय़ात चार तरुणी होत्या. त्यातील एक तरुणी स्टेजवर नाचत होती तर इतर तिघी ग्राहकांना मद्याचे पेले भरून देत चाळे करीत होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या