लातूरात जुगार अड्ड्यावर छापा; 8 जणांविरोधात गुन्हा दाखल , 4 जण फरार

लातूर जिल्ह्यातील मौजे आर्वी येथे सुरू असलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकूण 4 लाख 56 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 4 जण फरार असल्याची माहिती मिळाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील आर्वीत छापा टाकला. या प्रकरणी संभाजी बाळासाहेब भोसले (वय 32), राजेश उर्फ विशाल भागुराम उपाडे (वय 29), अजय विजयकुमार पांढरे, (वय 29), बिलाल एजाजमिया शेख (वय 29), रणजीत शेळके, (वय 30,फरार) ऋषिकेश माने (वय 25,फरार), पंकज अनिल शिंदे (वय 32, फरार), राजाभाऊ गायकवाड (वय 32 फरार) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे आरोपी पत्त्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहने असा एकूण 4 लाख 56 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, मनोज खोसे, नानासाहेब भोंग, मोहन सुरवसे, सचिन धारेकर ,रवी गोंदकर, राहुल कांबळे यांनी केली आहे.