ओडिशात लोकमान्य टिळक एक्सप्रेसला अपघात, 40 हून अधिक प्रवासी जखमी

527

ओडिशामधील कटकमध्ये एका एक्सप्रेस गाडीला अपघात झाला आहे. यात 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. सकाळी सात वाजता हा अपघात घडला असून त्यात 6 जखमींची प्रकृती गंभीर आहे.

मुंबई भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिनीस या गाडीला ओडिशाच्या कटकमध्ये अपघात झाला. सकाळी धुक्यांमुळे या गाडीला दुसर्‍या गाडीचा जोरात धक्का बसला त्यात या गाडीचे 8 डबे रुळावरून घसरले. त्यात आतापर्यंत 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल केले आहे. तसेच यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे.

अपघातानंतर रेल्वेने हेल्पलाईन नंबर जारी केलआ आहे. 0674-1072 आणि 0671-1072 असे हे नंबर असून प्रवाशांच्या मदतीसाठी सर्व प्रयत्न केले जातील असे रेल्वेने जाहीर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या