टिटवाळा रेल्वे स्थानकात रहिवाशांचे ‘रेल रोको’

40

सामना ऑनलाईन, टिटवाळा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर टिटवाळा स्थानकानजीक असणारी अतिक्रमणे हटवण्यासाठीच्या नोटिसा देण्यात आल्याविरोधात संतप्त रहिवाशांनी आज टिटवाळा – आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान ‘रेल रोको’ आंदोलन केले. पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर आणि लोकल गाडय़ांवर तुफान दगडफेक करत रेल्वे प्रवाशांना वेठीस धरले. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. सायंकाळी चार ते पाच एक तास सीएसटी – कसारा लोकल सेवा ठप्प झाली. या काळात 14 फेऱया रद्द कराव्या लागल्या. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना पांगवल्यानंतर मध्य रेल्वे रुळावर आली. दरम्यान रेल्वेने अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या