टिटवाळ्यात रेलरोको; अनधिकृत बांधकाम पाडण्याला विरोध

44

सामना ऑनलाईन । टिटवाळा

टिटवाळा स्थानकाजवळचे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईला विरोध करण्यासाठी स्थानिकांनी रुळावर येऊन रेलरोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे मुंबई आणि कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ ठप्प झाली होती. अखेर पोलिसांनी आंदोलकांना हटवले आणि वाहतूक पुन्हा सुरू झाली.

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून टिटवाळ्याच्या इंदिरानगरमध्ये अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू आहे. या कारवाईला स्थानिकांनी रेलरोको करुन विरोध केला आहे. याआधी १२ जानेवारीला डोंबिवली आणि कोपर स्टेशनदरम्यान नागरिकांनी रेल रोको आंदोलन केले होते. त्यावेळीही अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईला विरोध झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या