लोकल गोंधळामुळे प्रवाशांचा उद्रेक, वाशिंद येथे रेलरोको

51

सामना ऑनलाईन । वाशिंद

गेल्या चार दिवसांपासून ठप्प असलेल्या कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या संतापाचा ज्वालामुखी अखेर फुटला असून वाशिंद रेल्वे स्थानकात प्रवाशांनी रेलरोको आंदोलन सुरू केलं. आज सकाळी ११ पर्यंत गाड्या चालू न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे.

दुरांतो एक्प्रेसचे डबे घसरल्याने मंगळवारपासून कल्याण-कसारा वाहतूक ठप्प होती. शुक्रवार उजाडला तरी परिस्थिती कायम असल्याने लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी लांबपल्ल्याच्या गाड्या काही काळ रोखल्या. त्यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर सासे यांनी आज सकाळी १० ते ११ पर्यंत वेळापत्रकानुसार गाड्या सुरू करा, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, काही वेळानंतर प्रवाशांनी रेलरोको मागे घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या