फक्त 20 रुपयात मिळणार 10GB डेटा, हाय-स्पीडने चालेल इंटरनेट

आपण रेल्वे स्थानकांवर बर्‍याच वेळा विनामूल्य वायफायचा वापर केला असेल. रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा देणारी RailTel कंपनीने आता नवीन प्रीपेड वायफाय प्लान लॉन्च केले आहेत. याद्वारे आपण देशातील 4,000 रेल्वे स्थानकांवर प्रीपेड पेमेंटद्वारे हाय-स्पीड इंटरनेट सेवेचा वापर करू शकता. प्रवाशांना 10 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या प्रीपेड प्लानच्या किंमतीनुसार डेटा देण्यात येईल, ज्यामध्ये 34Mbps ची इंटरनेट स्पीड मिळेल.

RailTel कंपनी आधीपासूनच देशातील 5,950 हून अधिक रेल्वे स्थानकांवर विनामूल्य वायफाय सेवा प्रदान करीत आहे. रेल्वे प्रवासी त्यांच्या स्मार्टफोनद्वारे या सेवेचा वापर करू शकतात. यासाठी प्रवाशांना मोबाईल नंबरवर येणाऱ्या ओटीपीचे व्हेरिफिकेशन करणे आवश्यक असते.

वृत्तसंस्था पीटीआयच्यानुसार, नवीन प्रीपेड प्लानमध्ये प्रवासी दररोज जास्तीत जास्त 30 मिनिटांसाठी 1 एमबीपीएस स्पीडने इंटरनेटचा वापर करू शकतात. मात्र तुम्हाला 34Mpbs पर्यंत हाय स्पीड हवी असल्यास तुम्ही अत्यंत कमी किंमतीत याचे प्रीपेड प्लान घेऊ शकता.

किती रुपयात किती डेटा मिळणार

  • 10 रुपयात एक दिवसासाठी 5 जीबी
  • 15 रुपयात एक दिवसासाठी 10 जीबी
  • 20 रुपयात पाच दिवसांसाठी 10 जीबी
  • 30 रुपयात पाच दिवसांसाठी 20 जीबी
  • 40 रुपयात दहा दिवसांसाठी 20 जीबी
  • 50 रुपयात दहा दिवसांसाठी 30 जीबी
  • 70 रुपयात तीस दिवसांसाठी 60 जीबी
आपली प्रतिक्रिया द्या