रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्राला ४९९५ कोटींचा निधी

2036

मुंबई – यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्प २०१७-१८ मध्ये मुंबई आणि महाराष्ट्रात कामे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांवर एकूण ४९९५ कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे. त्यात मुंबईतील मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प भाग-२ आणि ३ ला अनुक्रमे ६३० कोटी व ६३६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच कोकण रेल्वेतील विविध पाच प्रकल्पांना ८१० कोटी रुपये मिळाले आहेत. तर पश्चिम महाराष्ट्राला (५०० कोटी), विदर्भाला (११८२ कोटी), मराठवाडय़ाला (७८० कोटी), उत्तर महाराष्ट्राला (४५७ कोटी ) असे ४९९५ कोटी रुपये खर्च करण्यासाठी मिळाले आहेत. तर मुंबईसह महाराष्ट्रातील ३८,४९२ कोटींचे नवीन प्रकल्प मंजूर केले आहेत.

मुंबई उपनगरातील नव्या विरार-वसई-पनवेल ८,७८७ कोटीचा कॉरिडॉर, सीएसटी-पनवेल १२,१३१ कोटींचा कॉरिडॉर, वांद्रे-विरार ७,६२८ कोटींचा कॉरिडॉर असे २८,५४६ कोटींचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात जेऊर-अष्ठाr १५६० कोटींचा नवा मार्ग, फलटण-पंढरपूर ११४९ कोटींचा नवा मार्ग असे ७१६९ कोटींचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. तसेच २०० कोटींच्या कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणास मंजुरी मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या