रेल्वेच्या कोरोनाबाधितांची योग्य काळजी घ्या! रेल कामगार सेनेने घेतली मध्य रेल्वेच्या डीआरएमची भेट

227

रेल्वेमध्ये ‘कोविड – १९’ पॉझिटीव्ह रूग्णांवर योग्य औैषधोपचार व्हावेत, ज्या कामगारांचे मृत्यू झाले आहेत, त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष पॅकेजची व्यवस्था करावी, तसेच जे कोरोनाने बाधित झाले आहेत, त्यांच्यासाठी आयसोलेशन कक्ष उभारून त्यांना योग्य उपचार पद्धती देण्यात यावी अशा विविध मागण्या रेल कामगार सेनेने मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांची भेट देऊन केल्या आहेत. त्यावर गोयल यांनी संबंधित अधिकाNयांना योग्य त्या सूचना केल्या आहेत.

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर ज्या रेल्वे कामगारांच्या वसाहती कटेंन्टमेंट झोनमुळे सिलबंद झाल्या आहेत, त्यांना कामावर घेताना त्यांच्या कामाचे तास कमी करण्यात यावेत तसेच ‘सोशल डिस्टन्सिंग’चे योग्य पालन करण्यासाठी त्यांच्या कामाच्या तासांचे योग्य नियोजन करावे, मुंबई विभागातील कामगारांच्या लॉबी, वर्वâशॉपमधील परिसर, कोचेस, शौचालय, रनिंग रूम, मोटरमनच्या कॅब, वर्कमन्स स्पेशलच्या गाड्या दररोज सॅनिटाईझ केल्या जाव्यात, गँगमन व ट्रॅकमनना कोरोना सेफ्टी किट द्यावेत अशाही मागण्या मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांच्याकडे केल्या. रेल कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे सरचिटणीस दिवाकर देव यांच्या शिष्ठमंडळाने या मागण्या केल्या. याप्रसंगी सहकार्याध्यक्ष जनार्दन देशपांडे, खजिनदार स्वप्निल झेमसे, मुंबई विभाग सचिव चंद्रकांत विनरकर, भरत शर्मा, परशुराम राणे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या