धुक्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने, वाशिंदमध्ये रेल रोको

35

सामना ऑनलाईन । मुंबई

ओखीच्या तडाख्यातून सावरलेल्या मुंबईने आता ऐन डिसेंबरची थंडीची दुलई पांघरली आहे. वर्षाचे काहीच महिने इतका गारवा अनुभवणाऱ्या मुंबईवर थंडीसोबत धुकंही पसरलं आहे. शनिवारी सकाळी धावतपळत कामाला निघालेल्या मुंबईकरांच्या पायाला धुक्याने ब्रेक लावला. कारण, धुक्यामुळे रेल्वेही नेहमीपेक्षा उशिराने धावत आहे.

साचलेल्या धुक्यामुळे मोटरमन्सना रेल्वे वेगात नेण्यास अडथळे होत असून पश्चिम रेल्वेसेवेला तब्बल १० ते १५ मिनिटांचा विलंब होत आहे. मध्य रेल्वेही तब्बल ३० मनिटे उशिराने धाव आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर तसंच पश्चिम उपनगरांतून धावणाऱ्या विरार लोकलच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.

दरम्यान, मध्ये रेल्वेच्या वाशिंद स्थानकात लोकल थांबवून लांब पल्ल्याच्या गाडीला प्रथम जाऊ दिल्यामुळे प्रवाशांनी संतप्त होत रेल रोको केला होता. मात्र, काही वेळाने प्रवाशांनी रेल रोको मागे घेतल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या