पुण्यात पोलीस कॉन्स्टेबलची गळफास लावून आत्महत्या

34

सामना ऑनलाईन । पिंपरी

पुणे लोहमार्ग पोलीस दलातील कान्स्टेबलने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दीपक कोळी (३०) असं आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. कृष्णा नगरमधील रेल्वे पोलीस वसाहतील राहत्या घरी दीपक यांनी आत्महत्या केली आहे. घरात ओढणीच्या साहाय्याने त्यांनी गळफास घेतला.

दीपक यांच्या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व मुले असा परिवार आहे. दीपक यांनी आत्महत्या का केली यांचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या