रेल्वेने प्रायव्हेट ट्रेनसाठी निविदेतील पूर्वाश्रमीच्या अनुभवाची अट काढली

557

रेल्वे मंत्रालयाने १०९ मार्गांवर १५१ खाजगी ट्रेन चालविण्याचा निर्णय गेल्याच आठवड्यात घेतला असून आता यासाठी कंपन्यांना आवतन देताना पूर्वाश्रमीच्या अनुभवाची तट निविदेतून काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे ३३ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असलेल्या या प्रकल्पासाठी आता जादा कंपन्यांना स्पर्धेत उतरणे सोपे होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

भारतीय रेल्वेने या अत्याधुनिक ट्रेन चालविण्यासाठी ‘पीपीपी’ मॉडेलची निवड केली असून खाजगी कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत. त्यातील कंपन्यांची पूर्वानुभवाची अट काढून टाकल्याने आता जादा कंपन्यांना या निविदा भरता येणार आहेत. त्यामुळे स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन प्रवाशांना जादा सुविधा मिळणार आहे. यासाठी ट्रेनचे डब्यांचे उत्पादन करणार्‍या उत्पादकांना निवडण्याचे अधिकारही कंपन्यांनाच असणार आहेत. या ट्रेनना प्रवाशांसाठीचा आवडता टाईम स्लॉट निवडणे, आरामदायी प्रवासासह, मुल्यवर्धीत सेवा पुरविणे यावर रेल्वेची कसोटी लागणार आहे.

ते मुंबई दरताशी १६० कि.मी.चा वेग
मुंबई ते दिल्ली आणि मुंबई ते कोलकाता अशी दर ताशी १६० कि.मी.च्या वेगाने ट्रेन धावण्यासाठी या मार्गाची क्षमता वाढविण्याचे काम सुरू झाले आहे. १५०० कोटी रूपयांच्या खर्चातून हे काम २०२३ पर्र्यंत तीन वर्षांत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवले आहे. सध्या रूळांची क्षमता वाढण्याचे काम वेगाने सुरू आहे. जसे काम पूर्ण होईल तसतसा गाड्यांचा वेग दर ताशी १००, ११० व १३० कि.मी. वाढविण्यात येणार आहे

स्पर्धात्मक भाडे असणार
आयआरसीटीसीने चालविलेल्या खाजगी ‘तेजस’ ट्रेनचे भाडे जादा असले तरी विमान तिकीटांच्या आणि इतर लक्झरी बसेसच्या भाड्यांच्या स्पर्धेमुळे ते प्रवाशांना खिशाला परवडेल असेच ठेवावे लागले होते. त्यामुळे या नव्या खाजगी ट्रेनचे भाडेही बाजारातील स्पर्धेमुळे अव्वाच्या सव्वा नसणार असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी गेल्याच आवठड्यात स्पष्ट केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या