रेल्वे धावणार खासगी तत्वावर, 27 सप्टेंबरच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी यासाठी रेल्वे खासगी तत्वावर चालवण्याचा विचार रेल्वे मंत्रालय करत आहे. यासाठी 27 सप्टेंबर रोजी वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक बोलवण्यात आली आहे.

राष्ट्रीय ट्रान्सपोर्टने आखलेल्या 100 दिवसांच्या अजेंड्यानुसार खासगी कंपन्यांना मुख्य मार्गावर रेल्वे चालवण्यास परवानगी द्यावी की नाही हा निर्णय घेण्यात येणार आहे. आयआरसीटीसीने लखनऊ ते नवी दिल्ली आणि मुंबई  ते अहमदाबद दरम्यान  धावणार्‍या दोन तेजस एक्सप्रेसच्या दोन ट्रेनचे प्रबंधन करण्याची खासगी कंपनींना दिली होती.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार  ट्रॅफिक रेल्वे बोर्डाच्या सदस्यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक बोलावली आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या योजनेनुसार लखनौ-नवी दिल्ली आणि मुंबई अहमदाबद रेल्वेमार्गावरील प्रबंधन आयआरसीटीसी कडे देण्यात येणार आहे. तसेच शहरारदरम्यान 14 मार्गांवर धावणार्‍या गाड्यांचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्यात येईल. या योजनेत रात्रभर धावणार्‍या लांब पल्ल्यांचा आणि चार उपनगरीय गाड्यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या