लालूप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबीयांची तीन एकर जमीन जप्त

38

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली/पाटणा

आयआरटीसी हॉटेल लिलावप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांची ३ एकर जमीन जप्त केली आहे. पाटणा येथील या जमिनीची किंमत ४५ कोटींच्या घरात आहे. पाटण्यातील ही जमीन लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांच्या नावावर होती आणि तेथे मॉल बनवण्याची तयारी सुरू होती, असे ईडीच्या अधिकाऱयांनी सांगितले. ईडीने ‘प्रिवेंशन ऑफ मनी लॉण्डरिंग’ कायद्याअंतर्गत ही जमीन जप्त केली आहे. गेल्या आठवडय़ात याप्रकरणी लालूप्रसाद यांच्या पत्नी राबडीदेवी यांची चौकशी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या