महिला वर्गासाठी खूशखबर! उद्यापासून सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा

महाराष्ट्र सरकारने केलेल्या मागणी नंतर अखेर रेल्वेमंत्र्यांनी सर्व महिला प्रवाशांसाठी रेल्वे प्रवासास परवानगी दिली आहे. त्यांनी थोडा वेळापूर्वी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

पियुष गोयल यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे की, मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत.

आपली प्रतिक्रिया द्या