Ratnagiri News : रत्नागिरीत सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस

कोकणात पाऊस थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळे जवजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर अजून दोन दिवस कायम राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

शुक्रवारपासून रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. गेले तीन दिवस पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे.

गेल्या 24 तासात जिल्ह्यात 798.20 मिमी पाऊस पडला. मंडणगडमध्ये 104.90 मिमी, दापोलीत 81.10 मिमी, खेड 66.50, गुहागर 99.80 मिमी, चिपळूण 57 मिमी, संगमेश्वर 91.60 मिमी, रत्नागिरी 111.60 मिमी, लांजा 94 मिमी आणि राजापूर 87, 70 मिमी पाऊस पडला.