रविवारचा ओव्हरटाईम करून पावसाची ईदला सुट्टी

15

सामना ऑनलाईन । मुंबई

रविवारी समस्त मुंबईकरांना पावसाने चिंब भिजवलं. शनिवार रात्रीपासून विजेच्या गडगडाटासोबत पावसाने मुंबईत ठाण मांडलं होतं. सुदैवाने रविवार असल्याने मुंबईकर घरी भजी आणि चहाचा आनंद लुटत होते. रविवारइतकाच पाऊस जर सोमवारी कोसळला तर लोकलसह रस्ते वाहतुकीचेही तीन तेरा वाजले असते. त्यामुळे आज कामावर जाणारे मुंबईकर झोपेतून जागे झाल्यानंतर पाऊस येणार तर नाहीना याकडे लक्ष ठेवून होते.

मात्र, रविवारी आता माझी सटकली अशा भावनेने कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी ईदनिमित्त सुट्टी घेतली की काय, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. कारण, रविवारी ओव्हरटाईम करणाऱ्या कर्मचाऱ्याप्रमाणे धो-धो कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी मात्र रजा घेणं पसंत केलं आहे. त्यामुळे अखेर पाऊस आला.. या आनंदात असलेल्या मुंबईकरांना आता पुन्हा पाऊस गायब तर होणार नाही ना.. याची चिंता वाटायला लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या