नागपूरात विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीजपुरवठा खंडीत

34
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपूरामध्ये रविवारी सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून, वेगवान वाऱ्यामुळे अनेक घरांचे छत उडून गेले आहेत. तसेच अनेक भागातील झाडे कोसळली आहेत. मुसळधार पावसाचा फटका ट्रान्सफार्मरलाही बसला असून अनेक भागातील वीजपुरवठा २ तासांपेक्षा जास्त वेळापासून खंडीत झाला आहे. त्यामुळे अनेक भाग काळोखात बुडाले आहेत. वर्धा, पुलगाव, कारंजा या भागांत मुसळधार पाऊस पडला.

हवामान विभागाने येत्या २४ तासांत वातावरणातील बदलामुळे पावसाचा जोर सुरूच राहण्याचा इशारा दिला आहे. दोन दिवस सलग पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र मान्सूनपूर्व पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या