नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा, गारपीटीने पिकांचे नुकसान

117

सामना प्रतिनिधी । नाशिक

सटाणा तालुक्यातील अनेक गावात रविवारी दुपारी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तसंच काही भागात गारपीटही झाली. अंबासन आणि आसखेडा या गावात गारपीट झाल्यानं डाळिंब, कांदा पिकांचं नुकसान झाले आहे.

nashik-rain-2

सटाणा तालुक्यातील नामपूर परिसराला आज रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास गारपीट, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं झोडपलं. अचानक आलेल्‍या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वारा व गारपिटीमुळे परिसरातील कांदा, गहू, डाळींब, कांदा बियाणांचे मोठं नुकसान झालं आहे. पावसाचा तडाखा इतका जबरदस्‍त होता की, काही क्षणातच अक्षरश: गारांचा खच रस्‍त्‍यावर पडला होता.

विठेवाडीत तिघे जखमी

देवळा तालुक्यातील विठेवाडी येथे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले. हिरामण आहेर यांच्या शेतातील घराची भिंत अंगावर पडून प्रमिला हिरामण आहेर (३९) आणि कुणाल हेमंत आहेर (६) जखमी झाले. याच गावात भिंत अंगावर कोसळल्याने एकनाथ यशवंत सोनवणे (१९) यालाही दुखापत झाली, तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तीनशे क्विंटल कांदा भिजला

फोटो-सोमनाथ जगताप
फोटो-सोमनाथ जगताप

निफाड तालकुॊयातील विंचूर येथे योगेश सालकडे यांनी आपल्या शेतात तीनशे क्विंटल उन्हाळ कांदा काढून ठेवला होता. हा उघड्यावरील कांदा भिजल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.

खडकमाळेगावला घरांची पडझड

निफाडच्या खडकमाळेगाव परिसराला दुपारी वादळाचा तडाखा बसला, येथे अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या