#MumbaiRains मुंबईत पहाटे पावसाच्या सरी, 3 जूनला वादळ धडकणार

1703

मुंबईत आज पहाटेच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला आहे. काही भागात तर पावसाने हजेरी देखील लावली. मुंबईत पावसाच्या सरी सुरू होताच ट्विटरवर देखील मुंबईचा पाऊस ट्रेंडिंगमध्ये आला आहे. #MumbaiRains या हॅशटॅगसह लोक फोटो, व्हिडीओ शेअर करत आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात 3 जून रोजी वादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुढील 48 तासांत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने दोन्ही राज्यांच्या किनारपट्टीवर वादळ धडकणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

https://twitter.com/Warina_Hussain/status/1267237422040932352?s=19

आपली प्रतिक्रिया द्या