पावसाच्या थेंबाच्या मिठाईची इंटरनेटवर धूम

सामना ऑनलाईन । लंडन

शीर्षक वाचून नक्कीच गोंधळला असाल.. हो ना? पावसाच्या थेंबांचा आणि मिठाईचा काय संबंध, असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचं उत्तर आहे, हो.. पावसाच्या पाण्याचा आणि मिठाईचा थेट संबंध आहे. कारण, पावसाच्या पाण्याच्या थेंबासारख्या दिसणाऱ्या एका मिठाईने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

पावसाच्या पाण्याच्या पारदर्शक थेंबाला जर स्थायूरूप मिळालं तर तो जसा दिसेल, तशीच ही मिठाई दिसते. म्हणूनच या मिठाईचं नाव रेनड्रॉप वॉटरकेक असं ठेवण्यात आलेलं आहे. मूळ जपानी असलेल्या मिठाईचा नक्की उगम कसा झाला ते मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काहींच्या मते ती आल्प्स पर्वताच्या दक्षिणेला असणाऱ्या झऱ्याच्या पाण्यापासून बनवली गेली. हे पाणी अतिशय चवदार असून त्याला फक्त स्थायूरूप देऊन ही मिठाई बनू शकते, असं काहींचं म्हणणं आहे.

पाहा या मिठाईच्या पाककृतीचा व्हिडिओ-

पण इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या मिठाईची पाककृती मात्र वेगळी आहे. एगर पावडर नामक एका जेली बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थापासून ती बनवली जाते. मात्र, ही मिठाई सर्व्ह केल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत संपवावी लागते. अन्यथा अर्ध्या तासाने ती पुन्हा पाण्यात रुपांतरित होते. तसंच हा गोड पदार्थ भेट म्हणून पार्सलही करून नेता येत नाही. भाजलेल्या सोयाबीनची पावडर आणि जपानमध्ये मिळणाऱ्या ब्लॅक शुगर सिरपसोबत ही सर्व्ह केली जाते.