राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा झंझावात

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघा मधील झालेल्या 86 ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेना व गावपॅनलने पुन्हा एकदा बाजी मारली असुन 67 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकल्याने शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजापूर तालुक्यातील 34 ग्रामपंचयातींवर तर लांजा तालुक्यातील 12 व साखरपा विभागातील 9 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असुन 12 ग्रामपंचायतींवर शिवसेना पुरस्कृत गावपॅनल ने बाजी मारुन आपले वर्चस्व राखले आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व ग्रामपंचायतीमध्ये सर्व पक्षांनी आपली ताकद पणाला लावली होती. शिवसेनेच्या वतीने शिवसेना सचिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेना उपनेते, शिवसेना प्रवक्ते,सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, लोकसभा समन्वय प्रदीप बोरकर, लोकसभा मतदारसंघ सह संपर्कप्रमुख भाई विचारे, संपर्कप्रमुख सुधीरजी मोरे, सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक व जिल्हाप्रमुख विलास चाळके आणि रत्नागिरी जिल्हा समन्वय शरदजी जाधव, लोकसभा महिला आघाडी नेहाताई माने, रत्नागिरी जिल्हा महिला संपर्कप्रमुख मीनलताई जुवाटकर, राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजनजी साळवी, विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, उप जिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, जिल्हा महिला आघाडी वेदाताई फडके, जिल्हा युवाधिकारी विनय गांगण, उप जिल्हा महिला आघाडी दुर्वाताई तावडे, तालुकाप्रमुख संदीप दळवी, प्रकाश कुवळेकर, प्रमोद पवार, तालुका महिला आघाडी योगिता साळवी, तालुका युवाधिकारी प्रफुल्ल लांजेकर, धनंजय गांधी, उप तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उप विभागप्रमुख, शाखाप्रमुख,गटप्रमुख, बूथप्रमुख, जि.प.अध्यक्ष, पं.स.सभापती, पं.स., जि.प. सदस्य, महिला आघाडी, युवासेना तसेच आजी-माजी पदाधिकारी आदि मंडळींच्या सहभागाने शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे.

शिवसेनेची भक्कम फळी तटबंदी असल्याने शिवसेनेने पुन्हा एकदा या निवडणूकीत बाजी मारून आपला दबदबा कायम ठेवला असुन शिवसेनेला मिळालेल्या अपेक्षित यशामुळे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजनजी साळवी यांनी समाधान व्यक्त करताना आगामी पंचायत समिती व जिल्हापरिषद निवडणूकी मध्ये त्याचा पुनश्च प्रत्यय नक्कीच येईल असे सांगून समस्त ग्रामस्थ मतदारांचे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजनजी साळवी यांनी आभार मानले आहेत.

लोवले ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

तालुक्यातील लोवले ग्रामपंचायतीच्या लढतीकडे संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचे लक्ष लागले होते. विद्यमान सरपंच चंद्रकांत चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येवून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गावाची एक गाव विकास कमिटी बनवली. या कमिटी मार्फत गावाचा विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रचार करण्यात आला. विरोधकांनी केलेल्या खोट्या प्रचाराला गावातील ग्रामस्थांनी पूर्णपणे नाकारुन उद्योजक संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या करण्यात आलेल्या पॅनेलच्या गळ्यात विजयाची माळ घातली.

लोवले ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागात एकूण 9 उमेदवार होते . शिवसेना पुरस्कृत गांव विकास कमिटीच्या सर्व जागा चांगल्या फरकाने निवडून आल्याबद्दल संजय शिंदे आणि नवनिर्वाचित सदस्यांचे आमदार तथा मंत्री उदय सामंत , जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, माजी आमदार रविंद्र माने, सुभाष बने, जिल्हा परिषद सदस्य माधवी गीते, तालुका प्रमुख प्रमोद पवार आदींनी खास अभिनंदन केले आहे .

आपली प्रतिक्रिया द्या