दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, वर्चस्वाच्या लढाईत 72 कोटींचे दुकान 510 कोटींना केले खरेदी

राजस्थानमध्ये दारूच्या दुकानाचा लिलाव सुरू होता. हे दुकान खरेदी करण्यासाठी येथील हनुमानगड जिल्ह्यातील अनेक लोक बोली लावण्यासाठी आले होते. या दारूच्या दुकानाचा लिलाव 72 लाख रुपयांपासून सुरु झाला आणि बघता-बघता बोली वाढत गेली. या दारूच्या दुकानाचा ताबा मिळवण्यासाठी एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्ये जुंपली. या दुकानाची बोली सकाळी 11 वाजता सुरु झाली, ती रात्री 2 वाजता 510 कोटी रुपयांच्या बोलीवर संपली.

मागील वर्षी याच दारूच्या दुकानाची 65 लाख रुपयांमध्ये विक्री करण्यात आली होती. ज्याचा आता पुन्हा लिलाव करण्यात आला. या दुकानाची बोली लावताना एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु झाली आणि 72 लाखांपासून सुरु झालेली ही बोली बघता-बघता 510 कोटींवर जाऊन पोहोचली.

ही बोली रात्री दोन वाजता संपल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील कारवाई सुरू केली. 510 कोटी रुपयांची बोली लावणाऱ्या किरण कंवर या महिलेला दुकानाच्या एकूण किंमतीच्या दोन टक्के रक्कम दोन दिवसांत जमा करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान अधिकाऱ्यांनी किरण कंवर यांच्या नावाने अलॉटमेन्ट लेटर जारी केले आहे. तसेच अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, जर महिलेने बोली लावली रक्कम न भरल्यास त्यांना ब्लॅक लिस्ट करण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या