राजस्थान विधानसभेला भुताने पछाडले!

69

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थान विधानसभेला भुतानेच पछाडले आहे. विधान भवनात चक्क भूत फिरतंय. प्रेतआत्मा येथे आहेत या शंकेने आमदार भयभीत झाले असून विधान भवनात पूजाअर्चा, होमहवन, शांती करावी अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, एका तांत्रिकाने विधानसभेच्या आवारात पूजाअर्चा केल्याची पाहिले असल्याचे काहींनी सांगितले. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

दोन दिवसांपूर्वी बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे पुत्र माजी मंत्री तेजप्रताप यांनी भुताच्या संशयाने सरकारी बंगला सोडला होता. त्यानंतर आता राजस्थानात भुताची चर्चा जोरात सुरू आहे. राजस्थानातील भाजप आमदार कल्याणसिंह चौधरी यांचे दोन दिवसांपूर्वीच दीर्घआजाराने निधन झाले. तत्पूर्वी भाजपचे आमदार कीर्तिकुमार यांचा मृत्यू झाला होता. या घटनांनंतर राजस्थान विधानसभेतील भूत बाटलीबाहेर काढण्यात आले.

विधानसभेत आमदारांची संख्या २०० आहे, पण विधानसभेची नवीन इमारत झाल्यापासून एकदाही सर्व २०० आमदार एकाही अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत. कधी आमदारांचे आजारपणामुळे निधन झाले तर एखाद्या आमदाराचा अपघाती मृत्यू झाला. कधी एखादा आमदार तुरुंगात गेला असे नेहमी घडले आहे. त्यामुळे विधान भवनाच्या इमारतीला भूतबाधा झाली असून तातडीने शांती,
आत्मा शांत करण्यासाठी आधी जमिनीचा मोबदला द्या!

ज्यांच्या जमिनीवर विधिमंडळाची इमारत बांधण्यात आली ती जमीन मालक प्रेम बियाणी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. भूत-प्रेत काही नाही. आमदारांनी अंधश्रद्धेचा प्रसार करू नये. १९६४ साली सरकारने आमची जमीन घेतली. पण गेली ५६ वर्षे झाले मोबदला दिलेला नाही. आमच्या चार पिढय़ा राजस्थान सरकारविरुद्ध कोर्टात लढल्या. त्यांचा मृत्यू झाला पण मोबदला दिला नाही. सरकारबरोबर लढणाऱया कुटुंबातील सदस्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी बियाणी यांनी केली आहे.

विधिमंडळाची इमारत १७ एकर जागेवर बांधण्यात आली आहे. १९९४ ते २००१ या काळात विधिमंडळाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. भाजपचे आमदार नागौर हबिबूर रहमान यांनी सांगितले की, विधिमंडळाच्या जागेवर आधी स्मशानभूमी होती. या ठिकाणी पूर्वी लहान मुलांच्या पार्थिवाला दफन केले जात होते. अशा ठिकाणी आत्मा फिरत असतो. अचानक आमदारांचा मृत्यू होत असल्यामुळे या वास्तूचे शुद्धीकरण करण्यात यावे. येथे पूजाअर्चा करावी किंवा मौलवींना बोलवून शुद्धीकरण करावे. वाईट आत्मा येथे घालवावा अशी मागणी मुख्यमंत्री वसुंधराराजेंकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या