राजस्थानातून आयएसआयच्या गुप्तहेराला अटक; पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप

पाकिस्तानातील गुप्तचर संस्थेसाठी (आयएसआय) हेरगिरी करणाऱ्या गुप्तहेराला राजस्थानातील बाडमेरमधून अटक करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाच्या सीआयडीबीआय विभागाने हेरगिरीच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे. रोशनलाल भिल (वय 35) असे अटक केलेल्या गुप्तहेराचे नाव आहे. तो पाकिस्तानच्या आयएसआयला हिंदुस्थानची सामरिक आणि गोपनीय माहिती पाठवत होता.

हिंदुस्थानबाबतची माहिती काढण्यासाठी आयएसआय सीमाभागातील नागरिकांना जाळ्यात ओढत आहे. पाकिस्तानात नातेवाईकांना भेटायला जाणाऱ्या नागरिकांना हेरून आयएसआय त्यांना जाळ्यात ओढते. त्यांना प्रलोभन दाखवून गोपनीय माहिती मिळवण्यात येते. हिंदुस्थानची माहिती काढण्यासाठी प्रलोभने दाखवण्यासह कधी धाक दाखवत माहिती काढण्यात येते. आयएसआय हिंदुस्थानची माहिती मिळवण्यासाठी सीमाभागातील नागरिकांना जाळ्यात ओढत आहे.

राजस्थानातल्या बाडमेरमधील एकजण आयएसआयला गोपनीय माहिती पुरवत असल्याचे एटीएसला समजले. एटीएसने सापळा रचून रोशनलाल भिल याला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक केली. त्याला चौकशीसाठी जयपूरला नेण्यात आले. तो आयएसआयला कधीपासून माहिती पुरवत होता,याची माहिती घेण्यात येत आहे. तसेच हिंदुस्थानात त्यांच्या संपर्कात असलेल्यांचाही शोध घेण्यात येत आहे.

रोशनलाल काही वर्षांपासून आयएसआयला माहिती पुरवत असल्याचा संशय आहे. हिंदुस्थानबाबतची सामरिक आणि इतर गोपनीय माहिती तो सीमेपलीकडे पाठवत होता. तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याची माहितीही मिळाली आहे. हिंदुस्थानात त्याच्या संपर्कात कोण होते, याचीही माहिती घेण्यात येत आहे. तसेच सीभागातील आयएसआयच्या संपर्कात असलेल्यांची माहितीही घेण्यात येत आहे.

रोशनलालचे काही नातेवाईक पाकिस्तानात आहे. त्यांना भेटण्यासाठी काही वर्षापूर्वी तो पाकिस्तानात गेला होता. त्यावेळी आयएसआयने त्याला जाळ्यात ओढल्याचा संशय आहे. तेव्हापासून तो आयएसआय़ला हिंदुस्थानची गोपनीय माहिती पुरवत होता. तसेच पाकिस्तानसाठी हिंदुस्थानात हेरगिरी करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या