राजस्थानमध्ये एअरफोर्सच्या ट्रकला अपघात; 3 जवानांचा मृत्यू, 3 गंभीर

423

राजस्थानमध्ये हवाईदलाच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. बाडमेरमध्ये झालेल्या या अपघातात हवाईदलाच्या 3 जवनांचा मृत्यू झाला असून 3 गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोन गंभीर जखमी जवानांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास हवाईदलाचा ट्रक राजस्थानमधील बाडमेर येथे चौहटन डोंगराजवळ अपघातग्रस्त झाला. या ट्रकमध्ये 6 जवान होते. यात तिघांचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी अजीत सिंह, चौहटनचे तहसीलदार सुनील कटेवा यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या