गेहलोत सरकारविरोधात भाजप आणणार अविश्वास प्रस्ताव

541

राजस्थान विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा भाजपने गुरुवारी केली.
राजस्थानमधील कॉँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे. त्यातच मध्यंतरी सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्या विरोधात बंड पुकारले होते. हे बंड आता शमले असले तरी त्यामुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या वातावरणाचा फायदा उठवण्याच्या प्रयत्नात भाजप आहे. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय भाजपच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती दिली. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जयपूरमध्ये भाजप आमदारांची बैठक झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री कसुंधरा राजे यादेखील उपस्थित होत्या. तसेच बैठकीत केंद्रीय नेतृत्वाकडून आलेले प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.

कॉँग्रेसमधील वाढत्या पक्षांतर्गत कुरबुरी पाहता विश्वासदर्शक ठराव जिंवणे ही गहलोत सरकारची प्राथमिकता आहे. काँग्रेस पक्ष आपल्या घरात टाके लावून कपडे जोडू पाहत आहे. मात्र कपडा फाटून गेला आहे. हे सरकार अंतर्किरोधामुळे पडेल, असे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी म्हटले आहे.

कॉँग्रेसमध्ये गेलेले बसपा आमदार हजर राहणार

बसपाच्या तिकिटावर निवडणूव जिंवल्यावर कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या सहा आमदारांना अधिवेशनात भाग घेण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी करत भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने बसपा आमदारांच्या कॉँग्रेस प्रवेशाबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे स्पष्ट करत त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. यामुळे गहलोत यांना दिलासा मिळाला असून बसपा आमदारांना अधिवेशनात हजर राहता येईल.

कॉँग्रेसने दोन आमदारांचे निलंबन केले रद्द

मुख्यमंत्री गहलोत यांच्या विरोधात पायलयट यांनी बंडाचे निशाण फडकावताच कॉँग्रेसने कठोर भूमिका घेत दोन आमदारांना निलंबित केले होते. आमदार भंवरलाल शर्मा आणि आमदार विश्वेंद्र सिंह यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येत असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या