राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यात एका गुरुकूलमध्ये आग लागल्याची घटना घडली असून तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य मुलांवर उपचार सुरु आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
राजस्थानच्या तलवास गावामध्ये एक प्राचीन गुरुकूल आहे, तिथे वेदपाठासोबतच अन्य विषयांववर तिथे शिकवले जाते. तिथे मुलं शिकून तिथेच राहतात. मुलांना तेथील निय म पाळावे लागतात. त्यांना वेदपाठात निपुण केले जाते. त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागतो. याच गुरुकुलमध्ये आज अचानक आग लागली. त्यावेळी खोलीत सहा मुलं होती. त्यांच्या गाद्या जळालेल्या अवस्थेत सापडले आहेत. गाद्या जळाल्याने तीन मुलांचा होरपळली असून त्यांनी बूंदीच्या जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
आज सकाळी देई पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. पोलीस या घटनेचा तपास करत आङेत. मुलांशी चौकशी केली असता अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. आग नेमकी कोणी लावली याबाबत अद्याप पत्ता लागलेला नाही. आगीत होरपळल्याने शिवशंकर, अभिजीत आणि नितेश हे जखमी झाले आहेत. तिघंही राजस्थानच्या वेगवेगळ्या शहरात राहतात. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन मुलांचे स्टेटमेण्ट घेतले आहेत.