‘पुन्हा सरकार पाडण्याचा खेळ सुरु होणार’, अशोक गेहलोत यांचा भाजपवर निशाणा

राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पुन्हा राजकीय गदारोळ सुरु झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आरोप केला आहे की, ‘पुन्हा सरकार पाडण्याचा खेळ सुरु होणार आहे.’ एका कार्यक्रमात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे आरोप केले आहेत.

गहलोत म्हणाले की, याआधी सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत असल्याचे साक्षीदार कॉंग्रेस नेते अजय माकन हे आहेत. ते म्हणाले की, राजस्थानमधील कॉंग्रेस प्रभारी अजय माकन हेही यात सहभागी होते. या घटनेदरम्यान माकन आपल्या आमदारांसोबत हॉटेलमध्ये 34 दिवस राहिले.

अशोक गहलोत यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आरोप केले आहेत की, ‘आपल्या आमदारांना बसून त्यांना चहा-नाश्ता खाऊ घालत शहा सांगत होते की पाच सरकार पाडली आहे, सहावीही पाडणार.’ गहलोत म्हणाले की, ‘अमित शहा यांनी एक तास आपल्या आमदारांसोबत बैठक केली आणि सरकार पाडण्याविषय चर्चा केली.’

असे बोलले जात आहे की, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपच्या बहाण्याने माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनाही लक्ष्य केले आहे. राजस्थानात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं बोललं जात आहे. अशातच त्यांनी सचिन पायलट यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या