तरुणाचा म्हशीवर बलात्कार, उदयपूरमधील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

राजस्थानच्या उदयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उदयपूर येथे एका तरुणाने म्हशीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यात अनैसर्गिक कृत्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

ही घटना उदयपूरच्या प्रताप नगर पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. सुंदरवास येथील गारीच्या मोहल्ला येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक तरुण एका म्हशीसोबत अनैसर्गिक संभोग करताना कैद झाला. त्यानंतर तरुणाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिकारी दीनदयाळ गोरा यांनी सांगितले की, रविवारी चिराग नावाच्या प्राणीप्रेमी तरुणाने फोन वरून या घटनेसंदर्भात माहिती दली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आयपीसी कलम 11(1)(अ) च्या कलम 377, 511 अन्वये तरुणाविरुद्ध क्रुएल्टी टू अॅनिमल्स ऍक्ट 1960 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधीही राजस्थानमध्ये अशी घटना समोर आली होती. भरतपूरमध्ये एका वृद्ध व्यक्तीने रस्त्यावरील श्वानावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची पुष्टी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून कारागृहात रवानगी केली होती.