निकाहच्या तासाभरानंतरच पतीने दिला पत्नीला तिहेरी तलाक

503

तिहेरी तलाक विरोधात देशात कडक कायदे केलेले असतानाही आजही तिहेरी तलाक देण्याचे प्रकार सुरू आहेत. राजस्थानमधील हरिपर्वत भागात एका तरुणाने निकाहच्या तासाभरातच त्याच्या पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

राजस्थानमधील ढोलपूर येथे राहणाऱ्या नदीमचा हरिपर्वत भागात राहणाऱ्या रुबीसोबत गुरुवारी निकाह झाला. निकाहच्या वेळी दोघांनीही मौलवी व काझींसमोर कबूल है सांगत त्यांची संमती दर्शवली. मात्र निकाहानंतर नदीमने सासरच्यांकडे गाडीची मागणी केली. मात्र रुबीच्या घरच्यांना गाडी देणे परवडणार नव्हते त्यामुळे ते नदीमला समजावू लागले. त्यावेळी नदीमच्या कुटुंबीयांनी देखील वाद घालायला सुरुवात करत रुबीच्या नातेवाईकांना मारहाण केली. त्यानंतर नदीमने सर्वांदेखत रुबीला तीन वेळा तलाक देत त्यांचे लग्न मोडल्याचे घोषीत केले. त्यानंतर रुबीचा भाऊ अमीर व तिची आई फरिशा बेगम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस तपास करत असून त्यानंतर नदीम व त्यांच्या कुंटुंबीयांना अटक करण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या