… म्हणून स्टेथेस्कोप सोडून डॉक्टर हुसैन यांना हाती ‘दांडा’ घ्यावा लागला

1527

जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा 15 लाख झाला असून मृतांची संख्या जवळपास 1 लाख झाली आहे. हिंदुस्थानमध्येही रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला असून संसर्ग टाळण्यासाठी अनेकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहेत. मात्र तरीही काही अतिउत्साही लोक स्वतःचा आणि आजूबाजूच्या लोकांचा जीव धोक्यात घालून बाहेर फिरताना दिसत आहे. त्यांना रोखण्यासाठी आता पोलिसांसोबत डॉक्टरांनी देखील हाती दांडा घेतला आहे. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हायरल होणारा हा फोटो राजस्थानमधील मरकाना येथील आहे. कोरोना संक्रमनापासून लोकांना वाचवण्यासाठी डॉक्टरांना स्टेथेस्कोप सोडून हाती दांडा घ्यावा लागला आहे. लुहारपूर भगत बाहेरून आलेल्या 38 तरुणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. गुरीवरी डॉक्टर आंबिद हुसेन आपल्या पथकासोबत या तरुणांची तपासणी करण्यासाठी गेले. यावेळी ही तरुण मंडळी घराबाहेर मोकाट फिरताना आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये मिसळताना दिसली.

डॉक्टरांनी त्यांना घरात राहण्याची विनंती केली, मात्र तरुणांनी ऐकले नाही. यानंतर डॉ. आबिद हुसैन यांनी गळ्यातील स्टेथस्कोप काढून हातात काठी घेतली आणि तरुणांच्या मागे धावले. डॉक्टरांनी काठी हातात घेतल्याचे पाहताच तरुण घरात पळाले. विशेष म्हणजे ज्या मरकाना भागात ही घटना घडली तिथे जवळपास 4500 लोकांना आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आले आहे, तर काहींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

screenshot_2020-04-10-14-55-49-521_com-android-chrome_copy_700x450

दरम्यान, होम क्वारंटाईन केलेल्या तरुणांमागे काठी घेऊन पळतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर डॉ. आबिद हुसैन यांनी सांगितले की, कोरोना महामारी चेहरा, जात, धर्म पाहून हल्ला करत नाही, तर बेजबाबदारपणाने वागणाऱ्या लोकांना विळखा घालते. आम्ही डॉक्टर आमच्या कुटुंबाची चिंता न करता जीव हातात घेऊन सेवा करत आहोत. 18 ते 19 तास ड्युटी करत आहोत. परंतु आयसोलेट केलेले किंवा होम क्वारंटाईन केलेले लोक बाहेर फिरू लागले तर धोका वाढणार. तसेच आमच्या हातात पेन, स्टेथोस्कोप चांगला दिसतो काठी नाही. परंतु तेथील परिस्थिती पाहून मला हातात दांडा घ्यावा लागला. मला त्यांना इजा पोहोचवण्यात स्वारस्य नव्हते, नंतर त्यांनी घरात राहावे हाच यामागील शुद्ध उद्देश होता, असेही डॉ. आबिद हुसैन म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या