गोवंश तस्करी प्रकरण; पहलू खानला मरणानंतर न्याय

820

दोन वर्षांपूर्वी गोतस्करीच्या संशयावरून जमावाच्या मारहाणीत प्राण गमावलेल्या पहलू खानला अखेर राजस्थान उच्च न्यायालयाकडून न्याय मिळाला. पहलूने कत्तल करण्यासाठी नव्हे तर डेअरीसाठी गाईंची खरेदी केली होती असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पहलू खान, त्याची दोन मुले व गाडीचालकाविरोधातील एफआयआर आणि आरोपपत्र रद्द करण्याचा आदेश दिला.

राजस्थानच्या अलवर परिसरात ही मॉब लिंचिंगची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी पहलूवर हल्ला करणाऱयांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी पहलू, त्याचे दोन मुलगे आरिफ व इरशाद आणि गाडीचालक खान मोहम्मद यांच्या विरोधात गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल केला होता. याला पहलूच्या मुलांनी व गाडीचालक मोहम्मदने आव्हान दिले होते. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना राजस्थान उच्च न्यायालयाने पहलूसह त्याची मुले व गाडीचालकाविरोधातील गोवंश तस्करीचा गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्याचा आदेश दिला.

आपली प्रतिक्रिया द्या