भयंकर! शेजारच्यांना धडा शिकवण्यासाठी नातीला आपटून ठार मारले

girl-child

राजस्थानमध्ये संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका आजीने शेजारच्यांना धडा शिकवण्यासाठी आपल्याच तीन वर्षाच्या नातीचा निर्दयीपणे आपटून जीव घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आजीला अटक केली आहे.

बोरीना गावात 30 मे रोजी अमरलाल मोग्या आणि रामेश्वर मोग्या या दोन शेजाऱ्यांमध्ये सरकारी ट्युबवेलवर पाणी भरायला जाणाऱ्या रस्त्यावरुन जोरदार वाद झाला होता. वाद इतका वाढला ती तो मारहाणीपर्यंत पोहोचला. मारहाणीत दोन्ही बाजूचे लोकं जखमी झाले होते. मारहाणीत रामेश्नर मोग्या यांच्या 12 वर्षीय मुलीला जखम झाली होती. तर अमरलाल मोग्या यांचे भाऊ धनराज आणि वडील लटूरलालही जखमी झाले होते. रामेश्वर मोग्या आपल्या मुलीला मार लागल्याने पोलीस स्थानकात तक्रार करायला जात होते. मात्र अमरलालची आई कनकबाईने त्याला विरोध केला. शिवाय तक्रार दाखल केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकीही दिली.

रामेश्वर मोग्या यांच्या कुटुंबियांवर सूड उगवण्यासाठी कनकबाईने आपल्याच तीन वर्षाच्या निरागस नातीला जमिनीवर आपटून आपटून ठार मारले. या मुलीच्या हत्येचा आळ रामेश्वरच्या कुटुंबियांवर घेण्याचा कनकबाईने कट रचला होता. मृत मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस अधिकारी रमेश कुमार मीणा यांनी तपास सुरू केला होता. चौकशीदरम्यान त्यांना कनकबाईवर संशय यायला लागला होता. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला.

आपली प्रतिक्रिया द्या