सेक्स पॉवर वाढवण्याच्या औषधामुळे जीव गेला? रात्री उशिरा झोपलेला तरुण मृतावस्थेत आढळला

राजस्थानातील धौलपूर इथे एका व्यक्तीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. मृत तरुण रात्री त्याच्या पत्नीसोबत झोपायला गेला होता. हा तरुण सकाळी, अर्धनग्न अवस्थेत शुद्ध हरपलेल्या स्थितीत आढळला होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला असून पोस्टमॉर्टेम अहवालातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकेल. हरीसिंह कुशवाहा (38 वर्षे) असं या तरुणाचं नाव आहे. रुपसपूर गावात राहणारा हरीसिंह हा रात्री उशिरा झोपला होता.

हरीसिंहला सकाळी उठवण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र काही केल्या तो शुद्धीवर येत नव्हता. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलेल्या बातमीत म्हटलं आहे की या तरुणाने सेक्स पॉवर वाढवण्याच्या गोळ्या घेतल्या होत्या, आणि त्यामुळेच कदाचित त्याचा मृत्यू झाला असावा. हरीसिंह हा ट्रॅक्टर चालवण्याचं काम करत होता आणि त्याला 4 मुलं आहे. हरीसिंहला कोणत्याही प्रकारची व्याधी नव्हती असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. हरीसिंह त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावणारा व्यक्ती होता, ज्यामुळे त्याच्या जाण्याने हरीसिंहच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.