‘काँग्रेस पक्ष सोडून गेलेले अनेक नेते पुन्हा पक्षात परततील’, गहलोत यांनी व्यक्त केला विश्वास

1252

राजस्थानात 14 ऑगस्टपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले आहेत की, ‘भाजप नेते आणि आमचा पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांविरोधात प्रत्येक घरात संताप आहे. माझा विश्वास आहे की, त्यांना हे समजत असून त्यातील बहुतेक नेते पुन्हा पक्षात परततील.’ यासोबतच गहलोत यांनी सर्व आमदारांना आपल्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

रविवारी मुख्यमंत्री गहलोत यांनी राजस्थान विधानसभेच्या सर्व आमदारांना पत्र लिहून लोकांच्या हितासाठी सत्यासोबत उभे राहण्याचे आणि लोकशाही वाचविण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी पत्रात सर्व आमदारांना राज्याच्या विकास आणि समृद्धीची आश्वासने पूर्ण करण्यात सहकार्य करण्यास सांगितले आहे. अशोक गहलोत म्हणाले, ‘मी आपणा सर्वांना आवाहन करतो की लोकशाही वाचवण्यासाठी, आमच्यावर लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि चुकीच्या परंपरांपासून वाचण्यासाठी तुम्ही जनतेचा आवाज ऐकावा.’ दरम्यान, विधानसभा अधिवेशन 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अनेक राजकीय घडामोडींनंतर राज्यपाल कलराज मिश्र यांनी याची परवानगी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या