भाजपच्या तीन केंद्रीय मंत्र्यांचा राजस्थान सरकार पाडण्याच्या षडयंत्रात सहभाग, मंत्र्यांचा आरोप

1629

राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे बंड सध्या फसलेले दिसत आहे. त्यांना यामुळे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदही गमवावे लागले आहे. यामुळे अशोक गहलोत यांच्या सरकारवरील धोका तूर्तास टळला असला तरी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गहलोत सरकारमधील कॅबिनेट मंत्री प्रताप सिंह खाचारियावास यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी राजस्थान सरकार पाडण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप, खाचारियावास यांनी केला.

भारतीय जनता पक्षाने आमच्या काही आमदारांना एका स्थानावर आज अपक्ष आमदारांना दुसऱ्या जागी ठेवले आहे. भाजपने जबरदस्तीने त्यांना तिथे ठेवले आहे, असा आरोप खाचारियावास यांनी केला. त्यांच्यात हिंमत असती तर आमदारांना राजस्थानमध्ये ठेवण्यात आले असते. भाजपच्या स्थानिक नेत्यांना केंद्रातील नेत्यांनी रचलेल्या षडयंत्राबाबत माहिती नाही. केंद्रीय नेतृत्व यशस्वी झाले असते तर अंतिम क्षणी स्थानी नेतृत्वाला यात सहभागी करून घेतले गेले असते, असेही ते म्हणाले.

images

केंद्रातील भाजप नेते यात सहभागी असल्याने आयकर विभाग, ईडी यांची छापेमारी सुरू करण्यात आली, असा आरोप खाचारियावास यांनी केला. याआधी मंत्री सुभाष गर्ग यांनी देखील भाजप आमदारांना तोडण्याचे काम करत असल्याचा आरोप केला.

आपली प्रतिक्रिया द्या